आनंददायी शिक्षणासाठी
आनंददायी शिक्षणासाठी
-किरण दशमुखे.
मुख्याध्यापक: स्वामी विवेकानंद बालविकास मंदिर, चौगाव तालुका- बागलाण जिल्हा नाशिक
मो.9420889575
मूल घरच्या सुरक्षित वातावरणातून सर्वप्रथम बाहेर पडते आणि ते शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकते. यावेळी त्याच्यासोबत घरचे कुणी नसते. विशेषत: आईवडिलांपासून ते प्रथमत:च एकटे असते. शाळेच्या नवीन विश्वात आलेले असते. यामुळे घरचे सुरक्षित वातावरण आणि नव्याने पाहत असलेला शालेय परिसर याची ते तुलना करू लागते.बालकाला सर्वप्रथम सुरक्षितता हवी असते. आपण येथे सुरक्षित आहोत ना,या गोष्टीचा ते कानोसा घेते. घरी त्याच्या जिव्हाळ्याची माणसं असतात. तेव्हा शाळेत नव्याने प्रवेश करणाऱ्या बालकाला देखील शिक्षकाचे प्रेम मिळाले तर बालक शाळेच्या नवीन वातावरणात देखील लगेच रमून जाते. त्याला जिव्हाळा हवा असतो. अशी जिव्हाळा, आपुलकी, त्याचा स्व जपणारी माणसं मिळाली की बालक आपसुकच त्या पर्यावरणात रमते. हळूहळू ते सकारात्मक प्रतिसाद देऊ लागते. शाळा देखील त्याला आता त्याचे ' सेकंड होम ' वाटू लागते. शाळेत नव्याने येणाऱ्या मुलाच्या मनात खूप प्रश्नांचे मोहोळ उठलेले असते. त्याच्या वयाच्या तीन,चार किंवा पाच या वर्षी ते घराची पायरी ओलांडून, एक सुरक्षित जागा सोडून शाळेच्या नव्या वातावरणात येते. तेव्हा त्याची एक अनामिक भीती त्याच्या मनात असते. ही भीती एकदा नष्ट झाली की, मूळ स्वतःहून शाळेत रमते. ते नियमित शाळेत यायला प्रवृत्त होते. आणि महत्त्वाचे म्हणजे असे झाले की, ते खूप आनंदाने अभ्यास करू लागते. त्याची अध्ययनाची गती वाढते. ज्ञान संक्रमणाचा वेग वाढतो. मूल लवकर शिकते. त्याची ज्ञानधारणा लवकर दृढ होते. या सर्व गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे शिक्षक प्रेमळ असला पाहिजे. शिक्षकांच्या जीवनात किती ही कष्ट, दुःख,विवंचना असल्या तरी बालकापुढे तो नेहमी आनंदी,हसतमुख असला पाहिजे. शिक्षकाला मूल दिसलं की, त्यांनी आपले प्रौढत्व विसरून मूल झाले पाहिजे. पूज्य विनोबाजी म्हणतात," ज्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी मोठे झाले पाहिजे; आणि ज्याला मुलांना शिकवायचे आहे त्याने लहान मूल झाले पाहिजे."
शिक्षक मुलात मूल होऊन मिसळेल तर मुले आनंदाने शिकतील. त्यांना भीती वाटणार नाही.नव्याने शाळेत दाखल झालेल्या मुलाला काय शिकवावे? विनोबाजी म्हणतात, मुलाला प्रथम चित्र शिकवावे. मुलांना चित्रांची भाषा लवकर कळते. चित्र हा त्यांचा आवडीचा भाग असतो. यामध्ये ते रमतात. त्यांचे रंजन होते. त्यांना खूप आनंद मिळतो. या दृष्टीने शिक्षकाने चित्रमय पद्धत अवलंबवावी. ए फॉर अँप्पल शिकवताना जर सफरचंदाचे स्केच काढले तर तो संबोध मुलांना लवकर लक्षात येतो. तसेच मराठी मुळाक्षरे शिकवताना अ- अननसाचे चित्र काढावे. अशा प्रकारे इंग्रजी मुळाक्षरे ए टू झेड व मराठी मुळाक्षरे अ ते ज्ञ यांची चित्रे काढण्याचे शिक्षक शिकला तर मुले आनंदाने ज्ञानग्रहण करतात. तसेच चित्रांची सहसंगती लावल्याने त्यांच्या लवकर लक्षात राहते.
दुसरी गोष्ट साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे," जो करील मनोरंजन मुलांचे, जडील नाते तयाशी प्रभूचे!" मुलांना रंजकतेने शिकवावे.मूल शाळेत रमेल,त्याची थोडी करमणूक होईल, याकडेही लक्ष पुरवावे. यासाठी मुलांना बडबड गीते तालासुरात म्हणून दाखवावीत. त्यांनाही म्हणायला लावावीत. मुलांना गाणी खूप आवडतात. पुन्हा पुन्हा म्हटल्याने त्यांचे मुखोदगत होते. त्याचा एक चांगला परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मुले आनंदी होतात.गाणी कृतीयुक्त पद्धतीने म्हणावीत.
त्याचप्रमाणे गोष्टी हा देखील मुलांचा आवडीचा प्रांत असतो. शिक्षकांनी मुलांना भरपूर गोष्टी सांगाव्यात. गोष्ट सांगण्यात शिक्षक तरबेज असावा. सांगताना नाट्यीकरण करता आले पाहिजे. आवाजातील आरोह-अवरोह, चेहऱ्यावरील हावभाव, अंगविक्षेप हे देखील जमले पाहिजे
गोष्टीचा खूप सकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलांच्या मनाची जडणघडण यातून होते. गोष्टीतील बोध मुलांच्या मनावर चांगला सकारात्मक परिणाम करते.मूल घडत जाते. संस्कारी बनत जाते.
वर्गात मूल आल्यानंतर केवळ आपणच बोलत राहणे,मुलांना संपूर्ण वेळ हाताची घडी, तोंडावर बोट,एका जागी बसवून ठेवणे,या गोष्टी केल्यास मूळ कंटाळते. मुलांना थोड्याफार हालचाली आवश्यक असतात.कडक शिस्तीच्या नावाखाली खूपच काटेकोर बंधने घालून चालत नाही. मुलांना काही प्रश्न विचारून त्यांना बोलते करावे. मुले पुढे येऊन बोलू लागतात. ती व्यक्त होतात. त्यांना तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या असतात,त्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढून त्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकाच्या मनात प्रत्येक मुलाबद्दल आदर असावा. मग ते हुशार असो अथवा गतिमंद. दोघांबद्दल त्याला सारखाच आदर वाटला पाहिजे. शिक्षकांनी मुलाबद्दल प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना ठेवली तर मूल देखील शिक्षकाचा आदर करू लागते.
मुले बऱ्याचदा पालकांचे ऐकत नाहीत. ते आपल्या शिक्षकाला प्रमाण मानते.आदर्श मानते. यासाठी मुलांना चांगल्या सवयी व शिस्त लावण्याची जबाबदारी आपसूकच शिक्षकांवर येते.शिक्षकांनी अधून मधून मुलांना चांगल्या सवयी समजावून सांगाव्यात.त्यांच्या समोर आपली कृती देखील आदर्श राहील याचे.नेहमी भान ठेवावे.अन्यथा मुले शिक्षकाची नक्कल करतात. मुलाच्या चांगल्या कृतीचे कौतुक करावे.मात्र चुकीचे वर्तन केल्यास त्याला रागवावे. मात्र हा राग मातृहृदयी असावा. त्याला शारीरिक शिक्षा करू नये. त्याला आपली चूक लक्षात आल्यास पुन्हा प्रेमाने जवळ घ्यावे.पाठीवर हात ठेवून अशी चूक करू नकोस म्हणून प्रेमळ शब्दात समजून सांगावे.
आपल्यासमोर बसलेली बालके किलकिल्या डोळ्यांनी आपल्याकडे आशेने बघत असतात. ते चातकाप्रमाणे ज्ञानबिंदू प्राशन करण्यासाठी उत्सुक असतात. आपण आपल्या उदासीनतेणे त्यांचा अपेक्षाभंग करू नये.उद्या काय शिकवायचे याचे नियोजन असलेच पाहिजे. तसे नसेल तर आपली अवस्था समुद्रात भरकटलेल्या नावे प्रमाणे होते. तसे करू नये. कोणताही पाठ शिकवण्यापूर्वी त्यावर चिंतन करावे. तो विद्यार्थ्यांना सहज सुलभ पद्धतीने कसा शिकविता येईल यावर विचार करावा. त्यासाठी शक्य असल्यास अध्यापन साहित्य बनवावे. कृती साधन महत्त्वाची भूमिका बजावते. पाठ, कविता शिकवल्यानंतर शक्य असल्यास मुलांना त्या कवी, लेखकाशी मोबाईल वरून संभाषण साधून द्यावे; किंवा त्या लेखकाची कलाकृती मुलांना दाखवावी. त्याबद्दल वेगळी विशेष माहिती द्यावी. यामुळे मुलांचा उत्साह वाढतो. थोडक्यात शिक्षकांनी आपला आळस झटकला, निष्काळजीपणा कमी केला तर सर्व काही सहज शक्य आहे. चला तर मग नवी पिढी घडवण्यासाठी आपण सारे सज्ज होऊया...

Comments
Post a Comment