आनंददायी शिक्षणासाठी
आनंददायी शिक्षणासाठी -किरण दशमुखे. मुख्याध्यापक: स्वामी विवेकानंद बालविकास मंदिर, चौगाव तालुका- बागलाण जिल्हा नाशिक मो.9420889575 मूल घरच्या सुरक्षित वातावरणातून सर्वप्रथम बाहेर पडते आणि ते शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल टाकते. यावेळी त्याच्यासोबत घरचे कुणी नसते. विशेषत: आईवडिलांपासून ते प्रथमत:च एकटे असते. शाळेच्या नवीन विश्वात आलेले असते. यामुळे घरचे सुरक्षित वातावरण आणि नव्याने पाहत असलेला शालेय परिसर याची ते तुलना करू लागते.बालकाला सर्वप्रथम सुरक्षितता हवी असते. आपण येथे सुरक्षित आहोत ना,या गोष्टीचा ते कानोसा घेते. घरी त्याच्या जिव्हाळ्याची माणसं असतात. तेव्हा शाळेत नव्याने प्रवेश करणाऱ्या बालकाला देखील शिक्षकाचे प्रेम मिळाले तर बालक शाळेच्या नवीन वातावरणात देखील लगेच रमून जाते....